नुकतीच दिवाळी संपून तुळशीची लग्न झाली. भिंगाचा चष्मा घालून सबंध महाराष्ट्रातील म्हातारी मानसं पोरापोरींचे वैवाहिक सौदे करायला मोकळे झाले. माझ्या घरातही "सहपरिवार आग्रहाचे निमंत्रण" असलेल्या ढिगभर लग्नपत्रिका येवून पडल्या. आमुक गावच्या पाहुण्यांनी सहा लाख मागितले. तमुक कोणीतरी सरकारी नोकरीत आहे,पाण्याखालची उत्तम शेती आहे! म्हणून पंधरा लाख वैगरे. माझ्याही घरात ताईच्या लग्नासाठी अशाच काही नाटकी बैठकी रंगल्या. हाँल मधल्या सोफ्यावर मी ही निर्जीवपणे बसायचो. आणी म्हणून हा वेगळा विषय मांडावा वाटतो. एकंदरीत हुंडा पुर्णपणे नष्ट करून स्रीवादाला पुर्णत्वाला नेता येईल असे काही योजले पाहीजे.
हुंडा ही रीतच मला मुळात घृणास्पद वाटते. हुंडा देणे आणी घेणे या दोहोंवर कायद्याने बंदी आहे. हे कीतपत आंमलात आहे, आपण जाणतो. समोरची व्यक्ती ही केवळ पुल्लींगी म्हणुन मोबदला (हुंडा) घेणे कीती लज्जास्पद! ह्या गोष्टी पुरोगामी आणी प्रगतशील देशाला जितक्या अशोभणिय तिक्याच समाज जिवनाला घातक आहेत. यात भर अशी की मुलाकडे वडिलोपार्जीत संपत्ती असले की हुंड्याचे दाम दुप्पट, डबल टू मार्केट रेट. आणी यामुळेच ती मंडळी माजतात , पुन्हा पुन्हा पैश्याची मागणी करतात, ऐतखाऊ प्रवृत्ती वाढते. आणी शेवट मुलींच्या घटस्फोटाने किंवा आत्महत्येने होतो. अशा घटस्फोटीत महिलांना माहेरी सुद्धा थारा मिळत नाही. अर्थात त्या स्वयंपुर्ण नसतात. यावर उपाय म्हणून फेरमांडणी युक्तीवाद पुढील उतार्यात मांडतोय.
मुलगा व मुलगी समान आहेत. दोघांनी चांगले शिक्षण,उच्च शिक्षण घ्यावे, बरोबरीने मोठ्या हुद्दयावर काम करावे. पण तरही मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबात असे होताना दिसत नाही. असे झालेच तर मग संपत्ती विभाजनाच्या वेळी तो स्री-पुरूष समावतावाद कुठे जातो? का ते आपल्या मुलींचा संपत्तीचा समान वाटा देत नाहीत?
उदाहरणार्थ - समजा एका कुटूंबात आई-वडील, मुलगा व मुलगी असे दोन आपत्य आहेत. तर त्यांनी मुलीच्या लग्नावेळी संपत्तीचे तीन समान भागांत विभाजन करून मुलीला सुद्धा द्यावा. स्वत:च्या वृद्धापकालासाठी संपत्तीचा दुसरा भाग स्वत: कडे आणी तिसरा मुलाला. यातुन फायदा असा की हुंड्याचा विषय उरणार नाही. भविष्यात जर एखाद्या महिलेचा घटस्फोट झालाच, तर ती माहेरच्या लोकांवर अवलंबून न राहता स्वतः स्वयंपुर्ण आणी स्वावलंबी होवू शकेल. अन् महिलांना स्वयंपुर्ण आणी खंबीर करणे ही खरी स्रीवादाची उद्धिष्टे आहेत. हुंडा विरोध करण्या पुरोगाम्यांनी अर्धवट स्रीवाद सोडून वरील बाबींचा विचार करून स्रीवाद पुर्णत्वाला न्याव्. अन्यथा ही तिढा सुटणार नाही.
: महेश एम माल्गे

Our young generation peoples are against dowry but our elder people are not so first of all us all of us to change the mindset of elder people
ReplyDeleteMahesh dada I too feel d same, hope many more people would understand now n bring about d change
ReplyDeleteMahesh u r right but it will be very good when all youth should think like u then and then only India will devlope
ReplyDeleteसुरुवात आपन करू।।
Deleteजर एखाद्या शास्त्रज्ञांनी एखाद्या भयानक आशा रोगावर उपचार पद्धती किंवा उपचार म्हणून एखादे औषध काढले तर तो त्याचा स्वतः वर प्रयोग करून पाहत असे. अशाच प्रकारे काही चांगल्या गोष्ठी समाजात रुजवायच्या असतील, लोकांना पटवून सांगायच्या असतील तर सुरुवात ही स्वतः पासून करणे गरजेचे असते, तेव्हा समाजातील प्रत्तेक पातळीवरील व्यक्ती आपल्या गोष्टींचं अनुकरण करू शकतो.
ReplyDeleteआमच्या गावात 2016 च्या शिवजयंती मध्ये शिव व्याख्याते शेख सुभान अली यांच्या समक्ष आम्ही हुंडा घेणार नाही म्हणून विचार मंचावर संपूर्ण गावकरी आणि शिवरायांच्या प्रतिमेला साक्ष ठेऊन शपथ घेतली.
जय जिजाऊ.
खूपच सुंदर लिखाण महेश.
ReplyDeleteKhp chhan
ReplyDelete